News Flash

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रांनी उडवली मोदी-शाहांची खिल्ली; ट्विट केलं कार्टून

दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची कमेंट्स बॉक्समध्ये तू तू मै मै

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अल्पन बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला जोरदार धक्का दिला आहे. दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांना दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांची नियुक्ती मुख्य सल्लागारपदी केली आहे. यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी एक व्यंगचित्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे. या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची खिल्ली उडवली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पोस्ट केलेल्या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आहेत. त्या व्यंगचित्राला साजेसा मजकूर लिहिण्यात आला आहे. हा मजकूर मुख्य सचिव असलेल्या अल्पन बंडोपाध्याय यांच्याशी निगडीत आहे. “मुख्य सचिव आपल्याला घाबरत नाही, आपण त्याच्या शिपायाला तरी समन्स पाठवू शकतो का?”, असं त्या व्यंगचित्रात लिहीलं आहे.

खासदार महुआ मोईत्रा यांनी हे व्यंगचित्र पोस्ट केल्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांची कमेंट्स बॉक्समध्ये तू तू मै मै सुरु झाली आहे. नेटकरीही या कमेंट्स वाचून मजा घेत आहेत.

केंद्र सरकार VS पश्चिम बंगाल सरकार: अल्पन बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती

यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकासान आढावा बैठकीवरुन पश्चिम बंगाल विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष पेटला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उशिरा हजेरी लावली होती. त्या नुकसान झालेल्या भागाचा अहवाल देत तेथून निघून गेल्या होत्या. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांनी दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक पाऊल पुढे जात अल्पन बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. तसेच मुख्य सचिवपद हरिकृष्ण द्विवेदी यांच्याकडे सोपवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 7:01 pm

Web Title: trinamool congress mp mahua moitra post cartoon on twitter and mocked modi shah rmt 84
Next Stories
1 केंद्र सरकार VS पश्चिम बंगाल सरकार: अल्पन बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती
2 दिल्लीत करोना रुग्ण संख्येत कमालीची घट; रुग्णवाढीचा दर १ टक्क्यांखाली
3 केजरीवाल यांनी करोना मृतांची खरी आकडेवारी लपवली; दिल्ली भाजपाचा आरोप
Just Now!
X