News Flash

पश्चिम बंगालमध्ये ममतांची जादू कायम

वादग्रस्त राजकीय मुद्दे आणि घोटाळे यांचा कुठलाही परिणाम न होता तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजय मिळवला आहे.

| February 17, 2015 02:34 am

वादग्रस्त राजकीय मुद्दे आणि घोटाळे यांचा कुठलाही परिणाम न होता तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममताबाला ठाकूर यांनी बोंगाव (राखीव) लोकसभा मतदारसंघात माकप उमेदवार देबेश दास यांचा २ लाख ११ हजार मताधिक्याने पराभव केला. किशनगंज विधानसभा पोटनिवडणूक तृणमूलचे सत्यजित बिस्वास यांनी ३७ हजार मताधिक्याने जिंकली. त्यांनी भाजपचे उमेदवार मानवेंद्र रॉय यांना हरवले.  सीबीआयने तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना शारदा घोटाळ्यात केलेली अटक व पक्षात फूट पडण्याची कुजबुज यामुळे  ही निवडणूक ममता बॅनर्जी सरकारची परीक्षा मानली जात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 2:34 am

Web Title: trinamool congress wins by polls in west bengal
टॅग : Mamata Banerjee
Next Stories
1 एअर इंडियाने प्रवाशांना दिलेल्या असंवेदनशील वागणुकीचा व्हिडिओ व्हायरल
2 भारत-श्रीलंका यांच्यात नागरी अणुकरार
3 शशी थरूर केरळातील वृत्तवाहिन्यांवर संतापले
Just Now!
X