03 March 2021

News Flash

तिहेरी तलाक विधेयकामुळे धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मतेला धोका : चंद्राबाबू नायडू

तिहेरी तलाक विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी भाजपाप्रणित एनडीए सरकारची आज राज्यसभेत कसोटी लागणार आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

तिहेरी तलाक विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी भाजपाप्रणित एनडीए सरकारची आज राज्यसभेत कसोटी लागणार आहे. त्यासाठी विरोधकांना समजावणे सरकारसाठी सोपी गोष्ट नाही. कारण राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ कमी असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे.


नायडू म्हणाले, मोदी सरकार तिहेरी तलाक विधेयक जबरदस्तीने देशावर थोपवू पाहत आहे. हे विधेयक देशाच्या धर्मनिरपेक्षतेला आणि राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचवणारे आहे. भाजपाचा मुस्लिमांकडे पाहण्याची वृत्ती ही घातक असून त्यांच्या या मुस्लिमविरोधी वृत्तीविरोधात लढा देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आज राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयकावर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिमांचा छळ करणाऱ्या या विधेयकाला पाठींबा देऊ नये असे आदेशही चंद्राबाबू नायडू यांनी तेलगू देसम पार्टीच्या (टीडीपी) राज्यसभा खासदारांना दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 11:35 am

Web Title: tripletalaq act is a danger for secularism and national integrity says ap cm chandrababu naidu
Next Stories
1 क्रिकेटपटू ते राजकारणी; बांगलादेशी कर्णधाराचा निवडणुकीत दणदणीत विजय
2 भाजपाचा नेता आहे सांगताच पोलीस अधिकारी म्हणाला, ‘मग तर अजून मारणार’
3 दुर्दैव ! दोन ट्रकमध्ये चिरडून कारचा अपघात, एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू
Just Now!
X