News Flash

इलेक्शन ड्युटीसाठी जाणाऱ्या जवानांच्या बसला अपघात, 29 जखमी

सोमवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात 29 जवान जखमी

त्रिपुरा जिल्ह्यात पश्चिमेकडील डोंगराळ क्षेत्रातील बारामुरा परिसरात सोमवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात 29 जवान जखमी झाले आहेत. इलेक्शन ड्यूटीसाठी छत्तीसगडला जात असताना जवानांच्या बसला अपघात झाल्याने ते जखमी झाले.


जखमी झालेले सर्व जवान त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या आठव्या बटालियनचे असून, सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, दोन गंभीर जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी कोलकाताला पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगरतळा येथून छत्तीसगडला इलेक्शन ड्यूटीसाठी जात असताना ही दुर्घटना घडली. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी रुग्णालयात जाऊन जखमी जवानांची भेट घेतली आणि सर्व जवानांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 12:05 pm

Web Title: tripura 8th battalion of tripura state rifles have been injured in a bus accident
Next Stories
1 सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल – शरद पवार
2 दिवाळीत आतषबाजी कायम; फटाके विक्रीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी
3 CBI War : उपसंचालक राकेश अस्थानांची घर वापसीची शक्यता
Just Now!
X