त्रिपुरात सकाळी सात वाजता मतदानास सुरूवात झाली. ३,२१४ मतदान केंद्रावर मतदान झाले. त्रिपुरा विधानसभेच्या ६० पैकी ५९ जागांवर मतदान होत आहे. चरिलम विधानसभा मतदारसंघातील माकपाचे उमेदवार रामेंद्र नारायण देववर्मा यांचे पाच दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे तिथे १२ मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात ३०७ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मागील २५ वर्षांपासून त्रिपुरात डाव्या पक्षाचे सरकार आहे. यंदा प्रथमच भाजपा पूर्ण ताकदीने उतरला असून पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या इथल्या सभा वादळी ठरल्या. यावेळी सध्या तरी लढत भाजपा आणि माकपा यांच्यातच दिसून येत आहे. मागील विधानसभेत माकपने ६० पैकी ४९ जागा जिंकून बहुमत मिळवले होते, तर काँग्रेसला १० जागा मिळाल्या होत्या. भाजपाला एकही जागा मिळवता आली नव्हती.

 

LIVE UPDATE: