06 August 2020

News Flash

मुख्यमंत्र्यांनी आईला बनवून दिलं आलं घातलेलं गरम पाणी; त्रिपुराचे बिप्लव देव यांनी कृतीतून दिला जनतेला संदेश

घरातील वृद्धांची काळजी घेण्याची केली विनंती

करोनाच्या या काळात वृद्धांनी बाहेर पडू नये असा संदेश अनेक जण देताहेत. पण त्यांची काळजी कशी घ्यावी याचं थेट उदाहरण त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी स्वतः दिलं आहे. त्यांनी आपल्या आईला आलं घातलेलं गरम पाणी तयार करू दिलं आणि सर्व घरातील वृद्धांची काळजी घ्या असा संदेशही दिला आहे.

त्रिपुरामध्ये एक दिवसाचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. ही घोषणा करताना मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी जनतेला आवाहन केलं होतं की, आपल्या घरतील वृद्धांची काळजी घ्या. पण ते केवळ सल्ला देण्यापुरतं त्यांनी हे केलं नाही तर त्यांनी याबाबत स्वतः कृतीही केली आहे. बिप्लव देव यांनी रविवारी सकाळी स्वतःच्या घरात स्वयंपाकघरात जाऊन पाणी गरम करायला ठेवले. त्यात आलं ठेचून टाकलं. ते आपल्या आपल्या आईला दिलं.

त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आता सर्व प्रकारचे उपाय त्यावर करून पाहिले जात आहेत. अनेक जण घरगुती उपाय करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 3:40 pm

Web Title: tripura cm biplab deb appeals take special care of elders hot water pkd 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 १०० जणांना वाढदिवसाची पार्टी देणाऱ्याचा करोनाने मृत्यू, उपस्थित असणाऱ्यांची चिंता वाढली
2 राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांवर पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींशी चर्चा
3 गलवान खोऱ्यातील जवानांच्या शौर्यावर लडाखमधील कविनं रचलं गीत; पाहा व्हिडीओ
Just Now!
X