News Flash

लग्नातील गर्दी पाहून जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा संताप, नवऱ्यामुलासह सर्वांना ओढून बाहेर काढलं; व्हिडीओ व्हायरल

लग्नात उपस्थित सर्वांना अटक

ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांचा संताप झाला आणि त्यांना कारवाई केली. पश्चिम त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी करोनाच्या नियमांचं उल्लंघन करत सुरु असलेलं लग्न रोखलं आणि कठोर कारवाई केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केल्याचा त्यांचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नियमांचं उल्लंघन केल्याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी लग्नाच्या हॉलवर कारवाई करत एक वर्षांसाठी बंदी घातली आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जिल्हा दंडाधिकारी शैलेश यादव लग्नाच्या हॉलवर धाड टाकताना दिसत आहेत. यावेळी तिथे नियमांचं उल्लंघन होताना पाहून त्यांचा संताप झाला. यावेळी त्यांनी नवऱ्यामुलासह उपस्थित सर्वांनाचा अक्षरश: खेचून बाहेर काढलं. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना नवरामुलगा आणि नवरीमुलीसोबत सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितलं आहे.

आणखी वाचा- चिंता वाढतीये! देशात गेल्या २४ तासांत एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद

यावेळी त्यांनी पोलिसांविरोधातही आपला संताप व्यक्त केला. पोलीस प्रशासनाला सहकार्य करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तिथे उपस्थित काही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. यामध्ये पूर्व अगरतालाचे ऑफिसर इंचार्जही आहेत. प्रसारमाध्यमांसमोरच त्यांनी अधिकाऱ्यावर आपला संताप व्यक्त करत कर्तव्याचं पालन न केल्याने फटकारलं.

व्हिडीओमध्ये जिल्हा दंडाधिकारी नवरीमुलीलाही स्टेजवरुन खाली उतरण्यास सांगत असून इतर नवऱ्यामुलासह इतर नातेवाईकांना बाहेर काढण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरामध्ये दिवसाला १०० हून अधिक रुग्ण सापडत आहेत. दरम्यान राज्याकडे रुग्णालयांना पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा नाहीत. त्रिपुराने अगरताला पालिका परिसरात २२ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 10:03 am

Web Title: tripura district magistrate seals two marriage halls for flouting covid norms sgy 87
Next Stories
1 “पंतप्रधान नरेंद्र मोदींच करोनाचे सुपर स्प्रेडर”; ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या उपाध्यक्षांचा हल्लाबोल
2 नव्या संसदेचं बांधकाम ‘अत्यावश्यक सेवा’; मोदी सरकारच्या निर्णयामुळे लॉकडाउनदरम्यानही काम सुरु
3 आसाम हादरले; भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी इमारतींना तडे
Just Now!
X