त्रिपुरातील ४० वर्षे जुने सीपीआय-एमचे मुखपत्र ‘डेली डेशर कथा’ तांत्रिक कारणावरून बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. भाजपा सरकारने बेकायदा कारवाई केल्याचा आरोप सीपीआय-एम पक्षाने केला आहे.

वृत्तपत्राच्या व्यवस्थापनात अनियमितता असल्याच्या आरोपावरून पश्चिम त्रिपुरा जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. जिल्हाधिकारी संदीप महात्मे यांनी १२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यानच्या चार सुनावण्यांनंतर प्रकाशन निलंबित करण्याचे आदेश बजावले. सीपीआय-एमचे नेते आणि वृत्तपत्राचे संस्थापक संपादक गौतम दास यांनी मंगळवारी सांगितले की, सत्ताधारी भाजपाने बेकायदा कृती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणला. वृत्तपत्र राज्य सरकारचे गैर प्रकाशन व पक्षाच्या लोकशाहीविरोधी धोरणाचे टीकाकार होते. मात्र, भाजपाने आरोप फेटाळले आहेत. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते मृणाल क्रांती देव यांनी या कारवाईत भाजपाचा हात नसल्याचे सांगितले.