20 September 2020

News Flash

हैदराबाद महानगरपालिकेत ‘टीआरएस’ची सरशी

टीआरएसने २००९ सालच्या महापालिका निवडणुकीत भाग घेतला नव्हता.

| February 6, 2016 12:13 am

बृहन् हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) आघाडी घेतली आहे. दीडशे सदस्यांच्या महापालिकेत पक्षाने ३० जागा जिंकल्या असून ४० प्रभागांमध्ये हा पक्ष आघाडीवर आहे.
आतापर्यंतचे कल पाहता, खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वातील एआयएमआयएम हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असून तेलुगु देसम-भाजप आघाडी आणि काँग्रेस हे पक्ष बरेच माघारले आहेत. एआयएमआयएमने आतापर्यंत १२ जागांवर विजय मिळवला आहे, तर तेदेप-भाजप आघाडी व काँग्रेस यांनी प्रत्येकी फक्त ३ जागा जिंकल्या आहेत.
२०१४ साली आंध्र प्रदेशातून वेगळे काढून तेलंगण राज्याची निर्मिती करण्यात आल्यानंतर हैदराबाद महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे ती प्रतिष्ठेची मानली जात होती.
टीआरएसने २००९ सालच्या महापालिका निवडणुकीत भाग घेतला नव्हता. या पाश्र्वभूमीवर त्यांनी यावेळी मिळवलेले यश नेत्रदीपक मानले जात आहे. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील या पक्षाने २००९ साली झालेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत महापालिका हद्दीत येणाऱ्या एकूण २४ जागांपैकी फक्त ३ जागा जिंकल्या होत्या.महानगरपालिकेत एआयएमआयएमसोबत युती करून सत्तेत सहभागी झालेल्या काँग्रेसचे या निवडणुकीत मोठे नुकसान झाले आहे. २००९ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ५५, एआयएमआयएमने ४३, तर त्यावेळी युती न केलेले तेलुगु देशम व भाजप या पक्षांनी मिळून ५० जागा मिळवल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2016 12:13 am

Web Title: trs in hyderabad municipal corporation
टॅग Trs
Next Stories
1 गुजरातमध्ये बस अपघातात ३७ प्रवासी ठार, २४ जखमी
2 जमात-उद-दवाच्या वतीने पाकिस्तानात काश्मीरप्रश्नी मोर्चे
3 बिहारमध्ये लोजप नेत्याची हत्या
Just Now!
X