मध्य प्रदेश विधानसभेच्या उपसभापती हिना कावारे यांच्या ताफ्यातील एका कारला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने धडक दिली. या दुर्देवी अपघातात तीन पोलिसांसह चौघांचा मृत्यू झाला. आरोपी ट्रक चालकाची पत्नी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होती. तिला प्रसूती कळा सुरु झाल्याचे समजल्यानंतर लवकरात लवकर तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेगात ट्रक पळवत असताना हा अपघात घडला.

मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात हा अपघात घडला. माझ्या गाडीचा चालक सर्तक नसता तर त्या ट्रक चालकाने आमच्या गाडीलाही चिरडले असते असे हिना कावारे यांनी सांगितले. सोलीटीका गावात हा अपघात घडला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.  अपघातानंतर ट्रक चालकाला लगेच अटक करण्यात आली. रात्री १२ च्या सुमारास ट्रक चालकाच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला. त्याचवेळी बेदरकारपणे गाडी चालवून चौघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी तिच्या वडिलांना अटक झाली होती. अपघातात जखमी झालेल्या एका पोलिसाला अधिक चांगल्या उपचारांसाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Hardik pandya stepBrother Vaibhav Pandya Arrested for Duping Cricketers
हार्दिक व क्रुणाल पंड्याला सावत्र भावानंच लावला ४.३ कोटींना चुना; मुंबई पोलिसांकडून अटक
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लानजीमधून विधानसभेवर निवडून गेलेल्या हिना कावारे उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच बालाघाट येथे गेल्या होत्या. या अपघातामागे माओवाद्यांचा हात आहे का ? त्या अंगाने सुद्धा पोलीस तपास करत आहेत. हिना यांच्या वडिलांची १६ डिसेंबर १९९९ रोजी माओवाद्यांनी बालाघाटच्या सोनीपूर गावात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली होती. हिना कावारे यांना मात्र या अपघातामागे कुठलाही घातपात वाटत नाही.