News Flash

ट्रम्प यांची हिटलरशी तुलना केल्याने इतिहास शिक्षकाला पगारी रजेची शिक्षा

दोन व्यक्तींची तुलना करण्यात काही गैर नसते ते ऐतिहासिक पातळीवर योग्यच असते.

| November 15, 2016 11:38 am

कॅलिफोर्नियातील शाळेत घडलेली घटना

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्याशी केल्याने कॅलिफोर्नियातील शाळेत एका इतिहास शिक्षकाला पगारी रजेवर पाठवण्यात आले आहे. जर्मन हुकूमशहा हिटलरच्या काळातील छळपर्वाबाबत तज्ञ मानल्या जाणाऱ्या फ्रँक नावारो यांनी माउंटन व्ह्य़ू हायस्कूल येथे मुलांना पाठ शिकवताना ट्रम्प यांची तुलना हिटलरशी केल्याने त्यांना प्राचार्य व जिल्हा अधीक्षकांनी रजेवर पाठवले आहे. पालकांनी या शिक्षकाबाबत तक्रार करणारा ई-मेल शाळेच्या अधिकाऱ्यांना पाठवला होता. नावारो हे गेली चाळीस वर्षे या शाळेत शिकवत आहेत. नावारो यांनी सांगितले की, मी ट्रम्प यांची तुलना हिटलर याच्याशी केली नाही, पालकांनी यात विपर्यास केला आहे. दोन व्यक्तींची तुलना करण्यात काही गैर नसते ते ऐतिहासिक पातळीवर योग्यच असते.

हिटलर व ट्रम्प यांचा उदय झाला तेव्हा दोघांनीही परदेशी लोकांना बाहेर काढण्याचा व स्वदेशाला महान करण्याचा नारा दिला होता. माझ्यावर कारवाई केली याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काही अर्थ राहिला नाही. मी जे बोललो ते सत्य होते हवे तर तपासून पाहा. त्यात प्रचार किंवा मत्सराचा मुद्दा नव्हता. निवडणुकीनंतर असा पाठ मुलांना शिकवणे धोकादायक आहे असे वाटल्याने कारवाई केली असे प्राचार्य डेव्ह ग्रीसॉम व अधीक्षक जेफ हार्डिग यांनी सांगितले. राजकीय विचारसरणीशी विद्यार्थ्यांचे नाते काहीही असले तरी त्यांना भावनिक ताण आला असावा, असे ग्रीसॉम यांनी पालकांना लिहिलेल्या पत्रत म्हटले असून विद्यार्थ्यांना भावनिक सुरक्षा असलेले वातावरण दिले जाईल असे नमूद केले आहे.मला पालकांचे व विद्यार्थ्यांचे मेल्स दाखवण्यात आले नाहीत असे नावारो यांनी म्हटले आहे. चेंज ओआरजी वर नावारो यांच्या वरील कारवाई विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर १६ हजार स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:00 am

Web Title: trump hillary comparison by history teacher
Next Stories
1 २०१६ सर्वात उष्ण वर्ष असल्याचा जागतिक हवामान संघटनेचा इशारा
2 कोणत्याही बँकेच्या एटीएममधून काढा पैसे, ३० नोव्हेंबरपर्यंत नाही शूल्क
3 नोटबंदीवर सरकार ठाम; विरोधी पक्षाशी दोन हात करण्यास तयार, एनडीएच्या बैठकीत निर्णय
Just Now!
X