19 October 2020

News Flash

अमेरिकेचा टिकटॉकला मोठा झटका; ९० दिवसांत संपत्ती विकण्याचे बाईटडान्सला आदेश

यापूर्वी कार्यकारी आदेशावर केली होती स्वाक्षरी

काही दिवसांपूर्वी भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह आणखी काही चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अन्य काही देशांमधूनही तसाच सूर उमटू लागला होता. अमेरिकेनंही सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकला ४५ दिवसांचा अल्टीमेटमही दिला होता. परंतु आता ट्रम्प यांनी चिनी कंपनी बाईटडान्सला ९० दिवसांमध्ये अमेरिकेतील आपली संपत्ती विकण्याचा आदेश दिला आहे. ज्याद्वारे कंपनी अमेरिकेत परिचालन करते ती  संपत्ती विकण्याचे आदेश ट्रम्प यांनी बाईटडान्सला दिले आहेत.

“काही विश्वसनीय माहिती मिळाली असून चिनी कंपनी बाईटडान्स असं काही काम करू शकते ज्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे,” असं ट्रम्प यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली होती. तसंच अर्थव्यवस्था. परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला हे अॅप धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी

काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वी-चॅट या कंपन्यांसोबत करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरदेखील निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या हा व्यवसाय खरेदी न करण्याच्या शक्यतेकडे पाहता त्यांनी देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत दिली होती. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीदेखील केली होती. यापूर्वी सीनेटनं अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्या टिकटॉक वापरण्यावर बंदी घालणाऱ्या आदेशाला मान्यता दिली होती. “टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात आहे,” असं ट्रम्प आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:47 pm

Web Title: trump orders bytedance to divest interest in us tiktok operations within 90 days security reason jud 87
Next Stories
1 खोटं बोलण्याबद्दल पश्चाताप वाटतो का? ट्रम्प यांना थेट प्रश्न विचारणारे पुणेकर शिरीष दाते कोण आहेत?
2 स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींकडून ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा
3 सार्वजनिक शौचालयात जात असताना अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार
Just Now!
X