अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आणखी एका वादात सापडले आहेत. त्यांनी नुकतीच रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लॅव्हऱॉव्ह यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी ट्रम्प यांनी अतिशय गुप्त स्वरूपाची माहिती रशियाला पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर झाल्याने अमेरिकेत खळबळ उडाली होती. अमेरिकन सरकारमध्ये काम करणाऱ्या दोघा अधिकाऱ्यांनी हा आरोप केल्याने सगळीकडे आश्चर्याची लाट पसरली होती. आयसिसविरोधात सीरियामध्ये करण्यात येणाऱ्या एका ऑपरेशनबद्द्लची अतिशय गुप्त माहिती त्यांनी रशियासारख्या शत्रुराष्ट्राला दिल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली पण मी अशी कोणतीही माहिती ऱशियाला पुरवली नाही. मी फक्त जागतिक दहशतवाद आणि हवाई सुरक्षेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्य़ा असं त्यांनी टि्वटरवरून सांगितलं.

 

त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॅकमास्टर यांनी राष्ट्राध्यक्षांच्या म्हणण्याला पाठिंबा दर्शवला.
“असे काहीही झालेले नाही. या बातम्या खोट्या आहे. मी त्या खोलीमध्येच होतो. असं काही झालेलं नाही” मॅकमास्टर यांनी म्हटलं