News Flash

ट्रम्प म्हणतात, “अमेरिकेत अनेकांना करोना झाला हे उत्तम झालं, कारण…”

अमेरिकेतील करोनाबाधितांची संख्येने मंगळवारी दीड कोटींचा टप्पा ओलांडला

(फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि एपी वरुन साभार)

जगभरामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. मागील अनेक महिन्यांपासून करोनामुळे जगभरामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. करोना परिस्थिती हाताळण्यात अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाला अपयश आल्याची टीका होतानाचे चित्र अनेकदा पहायला मिळाले. मात्र असं असतानाच दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनासंदर्भात आपल्या सरकारने चांगले काम केल्याचा दावा अनेकदा केला. या कालावमध्ये चीनवर टीका करण्याबरोबरच ट्रम्प यांनी केलेली अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरली. असेच एक वक्तव्य ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलं आहे. यावेळेस त्यांनी हर्ड इम्युनिटी म्हणजे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होण्यासंदर्भात भाष्य करताना, अमेरिकेतील अनेकांना करोनाचा संसर्ग झाला हे एका अर्थाने टेरिफिक म्हणजेच उत्तम आहे असं म्हटलं आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांना करोनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस त्यांनी अनेकांना करोनाचा संसर्ग झाला हे उत्तम आहे कारण करोनाचा संसर्ग होणं ही एका अर्थाने सर्वात शक्तीशाली लस आहे, असं मत व्यक्त केलं. मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी करोनाची लस निर्माण करणं हे आमचं पहिलं उद्दीष्ट होतं. लस निर्मितीला प्राधान्य असलं तरी जसा काळ लोटत आहे त्याप्रमाणे अनेकांमध्ये करोनाविरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होत आहे, असंही ट्रम्प यांनी म्हटलं. “माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेतील १५ टक्के नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. हे उत्तम (टेरिफिक) आहे. संसर्ग होणे ही सर्वात शक्तीशाली लस असल्यासारखंच आहे,” असंही ट्रम्प यांनी नमूद केलं.

ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्य हे हर्ड इम्युनिटीच्या पार्श्वभूमीवर होतं. हर्ड इम्युनिटी म्हणजेच बहुतांश व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात संसर्ग होत नाही. सेंटर्स ऑर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शनने नुकत्याच जारी केलेल्या अहवालामध्ये अमेरिकेतील १५ टक्के नागरिकांना सप्टेंबरपर्यंत करोनाचा संर्सग होऊन गेल्याचं म्हटलं होतं. याचाच संदर्भ ट्रम्प यांनी दिला. सध्या ब्रिटनमध्ये करोनाची लस देण्यासंदर्भातील मोहीम हाती घेण्यात आली आहे. आधी ब्रिटनने हर्ड इम्युनिटीच्या कल्पनेला पाठिंबा दिला होता.  ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील करोनाबाधितांची संख्येने मंगळवारी दीड कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 9:53 am

Web Title: trump says it is terrific so many americans have caught the coronavirus because it is a very powerful vaccine in itself scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ब्रिटनच्या संसदेत शेतकरी आंदोलनाचा मुद्दा; बोरिस जॉन्सन म्हणाले, “याचा तोडगा भारत-पाकिस्तानला…”
2 पोस्टाच्या बचत खात्यात आजपासून ‘ही’ किमान रक्कम ठेवाच; अन्यथा भरावा लागेल दंड
3 धक्कादायक! जेवणाला हात लावला म्हणून दलित तरुणाची हत्या
Just Now!
X