News Flash

ट्रम्प -किम चर्चा निष्फळ; कोणताही करार नाही

भविष्यकाळाबद्दल मात्र ट्रम्प आशावादी

डोनाल्ड ट्रम्प व त्तर कोरियाचे नेते किम जोन ऊंग

भविष्यकाळाबद्दल मात्र ट्रम्प आशावादी

हनोई : उत्तर कोरियावर घालण्यात आलेले निर्बंध उठविण्याची मागणी उत्तर कोरियाचे नेते किम जोन ऊंग यांनी केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ऊन यांच्यासमवेत सुरू असलेल्या शिखर परिषदेतून निघून गेलेष त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही करार न होताच बैठक गुरुवारी संपली.

सिंगापूरमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती त्यामुळे दुसऱ्या बैठकीतून काहीतरी चांगले निष्पन्न होण्याची अपेक्षा होती, मात्र कोणताही निर्णय न होताच चर्चा अपुरी राहिली. उत्तर कोरियावर घालण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे उठविण्याची त्यांची मागणी होती आणि आपण ती पूर्ण करू शकत नाही, असे ट्रम्प यांनी व्हिएतनामहून अमेरिकेला परतताना स्पष्ट केले, असे सांगण्यात आले आहे.

तथापि, चर्चेच्या वेळी आम्ही जी प्रगती केली आहे त्यामुळे भविष्यात काहीतरी चांगलेच निष्पन्न होईल, अशी स्थिती आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. घाईघाईने काहीतरी निर्णय घेण्यापेक्षा आपण योग्य निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 2:42 am

Web Title: trump says talks with kim there is no agreement
Next Stories
1 समझोता एक्स्प्रेसच्या भारतातील फेऱ्या स्थगित
2 बोल्टन यांचा डोवल यांच्याशी संवाद
3 पाकला संवादाची संधी द्या: शहिदाच्या पत्नीची भूमिका
Just Now!
X