News Flash

ट्रम्प यांची विरोधकांबरोबर डील! तीन आठवडयांसाठी अमेरिकेची शटडाऊनमधून सुटका

अमेरिकेत सुरु असलेले शटडाऊन लवकरच संपुष्टात येऊ शकते. अमेरिकन सरकारचे कामकाज पुन्हा चालू करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तोडगा काढला आहे.

अमेरिकेत सुरु असलेले शटडाऊन लवकरच संपुष्टात येऊ शकते. अमेरिकन सरकारचे कामकाज पुन्हा चालू करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तोडगा काढला आहे. त्यांनी विरोधी पक्षात असलेल्या डेमोक्रॅटस बरोबर तात्पुरत्या स्वरुपाचा करार केला आहे. अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याच्या मागणीवरुन गेल्या ३५ दिवसांपासून अमेरिकेत शटडाऊन सुरु आहे.

शटडाऊन संपवण्यासाठी आमच्यात करार झाला आहे. मी लवकरच १५ फेब्रुवारीपर्यंत सरकारचे कामकाज चालू ठेवण्यासाठी एका विधेयकावर स्वाक्षरी करेन असे ट्रम्प यांनी सांगितले. ही कोंडी फोडण्यासाठी अमेरिकन खासदार आणि व्हाईट हाऊसवर जनतेचा दबाव वाढत चालला आहे. या शटडाऊनमुळे हजारो अमेरिकन कर्मचाऱ्यांना वेतन मिळू शकलेले नाही.

बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी ५ अब्ज डॉलर्सची मागणी ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसकडे केली आहे. गुन्हेगार, ड्रग तस्करांना रोखण्यासाठी अशी भिंत आवश्यक असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. पुढचे २१ दिवस डेमोक्रॅटस आणि रिपब्लिकन परस्परांवर विश्वास ठेऊन चांगले काम करतील अशी मला आशा वाटते.

काँग्रेलमध्ये निधी मंजूर झाला नाही तर तीन आठवडयांनी पुन्हा शटडाऊन होऊ शकते असा इशारा ट्रम्प यांनी दिला. काँग्रेसमध्ये चांगला प्रस्ताव मिळाला नाही तर १५ फेब्रुवारीला पुन्हा एकदा शटडाऊन होईल किंवा अमेरिकन कायदा आणि संविधनाने दिलेल्या अधिकाराचा मी उपयोग करेन असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 4:19 am

Web Title: trump strikes deal to reopen govt for three weeks
Next Stories
1 ‘सर्वच लोकशाही संस्थांत संघाचा घुसखोरीचा प्रयत्न’
2 ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कृष्णा सोबती यांचे निधन
3 चेन्नईत कर्करोगावरील प्रोटॉन उपचारपद्धती उपलब्ध
Just Now!
X