वॉशिंग्टन : इराणी गटांच्या इराकी समर्थकांनी बगदाद येथील अमेरिकी दूतावासावर हल्ला करून राजनैतिक अधिकाऱ्यांना  तेथून बाहेर पडू न दिल्याच्या प्रकारानंतर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धोक्याचा इशारा दिला आहे पण युद्धाची धमकी  देण्याचे  मात्र टाळले आहे.

इराणी गटांचे समर्थक असलेल्या शेकडो संतप्त इराकी शिया मुस्लीम लोकांनी अमेरिकी दूतावासात घुसून धुडगूस घातला, त्यात महिलांचाही समावेश होता. अमेरिकी दूतावास अतिसुरक्षित असतानाही हे लोक तेथे घुसले, त्यांनी मुख्य दरवाजा तोडून टाकला व  ‘डेथ टून अमेरिका’ अशा घोषणा दिल्या. इराण समर्थित कतेब हेजबोल्ला गटांवर अमेरिकेने हल्ले केले, त्यात २५ जण ठार झाले होते.

अध्यक्ष ट्रम्प यांनी वार्ताहरांना सांगितले,की सध्याची परिस्थिती आम्ही चांगल्या प्रकारे हाताळत आहोत. आमचे चांगले योद्धे तेथे आहेत, बेंगझाईसारखा प्रकार आम्ही होऊ  दिलेला नाही. इराणशी आम्ही त्यासाठी युद्ध करणार नाही. आम्हाला शांतता हवी आहे. पण आमच्या दूतावासावर जो हल्ला करण्यात आला त्याला इराण जबाबदार आहे. त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल, हा इशारा नसून धमकी आहे. आमचे सैनिक अत्याधुनिक शस्त्रांसह लगेच तिथे पोहोचले, यात त्यांनी इराकचे अध्यक्ष व पंतप्रधान यांचेही आभार मानतो कारण त्यांनीही लगेच प्रतिसाद दिला. बगदादमधील सुरक्षेसाठी आता अमेरिकेने सैन्य वाढवण्याचा निर्णयम् घेतला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांन सांगितले,की आम्ही जलद प्रतिसाद दलाच्या ८२ व्या तुकडीतील जवान तेथे पाठवत आहेत, एकूण ७५० सैनिक तेथे सुरक्षेसाठी तैनात केले जातील.दरम्यान ट्रम्प यांनी इराकचे पंतप्रधान अदिल अब्द अल महदी यांच्याशी प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा केली. इराकमधील अमेरिकी आस्थापनांचे रक्षण करण्यात कसूर होता कामा नये अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली.