12 August 2020

News Flash

‘टिकटॉक’वर बंदीचे ट्रम्प यांचे सूतोवाच 

आपत्कालीन आर्थिक अधिकारांचा वापर करून  अध्यादेश जारी करू.  

संग्रहित छायाचित्र

टिकटॉक हे चीनचे उपयोजन (अ‍ॅप) विकत घेण्याचे प्रयत्न अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनी करीत असतानाच अध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र त्या उपयोजनावर बंदी घालण्याचे सूचित केले आहे.

टिकटॉकसह चीनच्या शंभराहून अधिक उपयोजनांवर भारताने बंदी घातली आहे. त्यानंतर अनेकदा अध्यक्ष ट्रम्प व परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनीही चिनी उपयोजनांवर बंदी घालण्याचे वक्तव्य  केले होते. ट्रम्प यांनी फ्लोरिडातून एअर फोर्स वन विमानाने निघताना वार्ताहरांना सांगितले, की टिक टॉकवर अमेरिकेत बंदी घालण्यासाठी आपण आपत्कालीन आर्थिक अधिकारांचा वापर करून  अध्यादेश जारी करू.

ते म्हणाले, की अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने अमेरिकेची टिक टॉक उपयोजनाची शाखा विकत घेण्याचे व्यवहार करू नयेत, असे आपल्याला वाटते. टिकटॉकवर बंदी घालण्याबाबत आम्ही दोन पर्यायांचा विचार करीत आहोत. परिस्थितीनुसार पर्यायी मार्ग निवडला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:34 am

Web Title: trumps ban on tiktok abn 97
Next Stories
1 देशात २४ तासांत ५७ हजार बाधित
2 पर्यावरण परवान्यांच्या निकषांबाबत सरकार असंवेदनशील
3 ट्विटर हल्ल्याचे सूत्रधार अटकेत
Just Now!
X