शबरीमला मंदिरात दर्शन घेणारच असा हट्ट घेऊन केरळमध्ये दाखल झालेल्या तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखण्यात आलं आहे. अशात शबरीमला मंदिराच्या समर्थकांनी आंदोलकांनी तृप्ती देसाईंना परत फिरण्याचा इशारा दिला आहे. तृप्ती देसाईंनी परत फिरावं अन्यथा त्यांना आमच्या छातीवर पाय देऊन मंदिरात जावं लागेल असा इशाराच विमानतळाबाहेर ठाण मांडून बसलेल्या राहुल इश्वर यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई या आज सकाळपासूनच कोची विमानतळावर ठिय्या देऊन बसल्या आहेत. शबरीमला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याशिवाय आपण महाराष्ट्रात परतणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर शबरीमला मंदिरात मला पोहचता येऊ नये म्हणून स्थानिक टॅक्सीचालकांनाही धमकावण्यात आल्याचे तृप्ती देसाईंनी म्हटले आहे.

शबरीमला मंदिरात जाऊन दर्शन घेणारच असा निश्चय केलेल्या तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखण्यात आलं.
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेश नाकारल्याने तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. गुरुवारी त्यांनी मंदिर प्रवेशाचा आपला मानस बोलून दाखवला होता. त्यासाठी त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिले होते. तसेच मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र आज त्या कोची विमानतळावर आल्या तेव्हा तिथेच त्यांना रोखण्यात आलं. आता यानंतर आंदोलक राहुल इश्वार यांनी त्यांना थेट इशाराच दिला आहे. त्यामुळे आता तृप्ती देसाई काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trupti desai should go back she will have to step on our chests and walk over us if she wants to enter sabarimala temple says rahul ishwar
First published on: 16-11-2018 at 17:04 IST