19 October 2020

News Flash

विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, शिक्षिकाच प्रियकराला करत होती मदत

लैंगिक शोषण करुन ब्लॅकमेल करण्यासाठी त्या कृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी ट्युशन टीचर आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

(सांकेतिक छायाचित्र)

अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करुन ब्लॅकमेल करण्यासाठी त्या कृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी ट्युशन टीचर आणि तिच्या प्रियकराला पॉस्कोकायद्यातंर्गत अटक केली आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी संजना (२८) आणि बालाजी (३८) या दोघांना अटक केली आहे. संजना दहावीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेते. बालाजी मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या कोचिंग सेंटरला भेट द्यायचा. बालाजी संजनाकडे क्लासला येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर मैत्री करायचा. नंतर त्यांचे शोषण करायचा. क्लासला येणाऱ्या ज्या मुला-मुलींमध्ये मैत्रीचे नाते आहे. त्यांना तो एकत्र बाहेर फिरायला जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा. त्याचवेळी दोघे एकत्र असताना त्यांचे चित्रीकरण करुन तो ब्लॅकमेल करायचा.

बालाजी मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांचे लैंगिक शोषण करायचा. कोचिंग क्लासच्या जवळच त्याने एक घर भाडयावर घेतले होते. तिथे तो ही सर्व कृत्य करत होता. बालाजीची प्रेयसी संजना सुद्धा त्याला या कामामध्ये मदत करायची. तक्रारदार मुलीला बालाजीने त्याचा क्लासमध्ये शिकणाऱ्या एका मुलाबरोबर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले. बालाजीने त्याच्या मोबाइलवर हे सर्व चित्रीकरण केले व नंतर दोन्ही मुलांना ब्लॅकमेल करायला त्याने सुरुवात केली.

असेच प्रकार त्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांबरोबरही केले. व्हिडीओचा वापर करुन त्याचे तक्रारदार अल्पवयीन मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजना आणि बालाजीने पीडित मुलीकडून दागिने आणि पैसे उकळले. या जोडप्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी नेऊनही त्यांचे लैंगिक शोषण केले का? त्याचा तपास सुरु आहे.
बालाजी आणि संजनाने आतापर्यंत नेमके किती विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केले ते स्पष्ट झालेले नाही. दोघांविरोधात बलात्कार, खंडणीचा गुन्हा मामबालाम पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला आहे. सध्या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 1:34 pm

Web Title: tuition teacher lover held in sexual abuse of students dmp 82
Next Stories
1 प्रदूषण वाढलं; वाराणसीत देवी-देवतांच्या मूर्तींना घातले मास्क
2 रेल्वेतील नोकरीसंदर्भातील जाहिरातीमध्ये एक चूक झाली अन् गेली एचआरची नोकरी
3 ‘भाजपाने संख्याबळाशिवाय सत्ता स्थापन करणं धोकादायक’
Just Now!
X