पश्चिम तुर्की आणि ग्रीस या देशांतील काही भाग आज (शुक्रवार) भूकंपाचे तीव्र झटक्यांची हादरले. या भूकंपाची तीव्रता ७ रिश्टर स्केल असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने सांगितलं आहे. या विनाशकारी भूंकपामुळे इजमिर शहरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले. ताज्या माहिनुसार, आत्तापर्यंत या भूंकपात चार जणांचा मृत्यू झाला असून १२० लोक जखमी झाले आहेत.

युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या (ईएमएससी) माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल इतकी होती. याचं केंद्र समोसच्या ग्रीक बेटांपासून १३ किमी ईशान्येला होता. तर तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थान विभागाच्या अध्यक्षांनी सांगितलं की, भूकंपाची तीव्रता ६.६ नोंदवली गेली आहे. याचं केंद्र १६.५ किमी खोलवर होतं.

तुर्कीचे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी ट्वीट करुन माहिती दिली की, या भूंकपामुळे ६ इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. किरकोळ भेगा सोडल्यास उसाक, डेनिजली, मनीसा, बालिकेसिर, आयडिन आणि मुअला येथे जीवित आणि वित्तहानीची माहिती नाही.

तुर्कीच्या इजमिर शहरात त्सुनामीचे वृत्त

या शक्तीशाली भूकंपामुळे तुर्कीच्या इजमिर शहरात त्सुनामी आल्याची देखील माहिती मिळते आहे.

काही नेटकऱ्यांनी या त्सुनामी सदृश्य परिस्थितीचे व्हिडिओ चित्रण करुन ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.