त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता? वाक्य तुम्ही ऐकलं असेलच. पण या वाक्याची आठवण व्हावी, अशीच घटना हरयाणातील गुरुग्राममध्ये घडली आहे. कुत्र्याचं नाव टॉमी असूनही शेजाऱ्याने कुत्रा म्हटल्यानं तुफान राडा झाला. इतकंच काय कुत्र्याच्या मालकांने शेजाऱ्यांना मारहाण केली.

हरयाणातील गुरुग्राममध्ये ज्योती पार्क येथील ही घटना आहे. सुधीर यांच्या शेजाऱ्याने कुत्रा पाळला होता. त्याने कुत्र्याचं नामकरण टॉमी केलं होतं. पाळलेला कुत्रा आक्रमक असल्याने आणि चावायला धावत असल्याने परिसरातील शेजारी त्रस्त झाले होते. त्यामुळे सुधीर यांनी त्या शेजाऱ्याला कुत्र्याला साखळीने बांधून ठेवण्याचा सल्ला दिला.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?

कुत्र्याला साखळीने बांधण्याच्या सुधीर यांनी दिलेल्या सल्ल्याचं कुत्र्याच्या मालकाला वाईट वाटलं नाही, तर त्याने कुत्रा म्हटल्यानं त्याला राग आला. टॉमीला कुत्रा म्हटल्याने कुत्र्याचा मालक संतप्त झाला. टॉमीला कुत्रा म्हटल्यानं दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. बघता बघता वाद शिगेला गेला आणि कुत्र्याला बांधून ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या सुधीर यांना कुत्र्याच्या मालकाने मारहाण करण्यास सुरूवात केली.

वाद इतका विकोपाला गेला की, कुत्र्याच्या मालकाने सुधीर यांच्यावर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. कुत्र्याच्या मालकाने मारहाण करताना महिला आणि लहान मुलांनाही सोडलं नाही. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, सुधीर यांच्या कुटुंबातील सदस्याने गंभीर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी सुधीर यांनी गुरुग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून चौकशी सुरू केली आहे.