News Flash

भारतीय वंशाचा तनिष्क १८व्या वर्षी डॉक्टर होणार

डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ व सांताक्रूझ येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ यांनी त्याची निवड केली आहे.

भारतीय वंशाचा एक बारा वर्षांचा अमेरिकी मुलगा अमेरिकी कॉलेजमधून पदवीधर झाला असून, तो वयाच्या अठराव्या वर्षी डॉक्टर होणार हे निश्चित झाले आहे. या मुलाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अभिनंदन केले आहे. दोन प्रतिष्ठित विद्यापीठांनी घेतलेल्या मुलाखतीत त्याची वैद्यकीय शिक्षणासाठी निवडही झाली आहे. तनिष्क अब्राहम असे या मुलाचे नाव असून, तो कॅलिफोर्नियातील सॅक्रॉमेंटोचा आहे.

डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ व सांताक्रूझ येथील कॅलिफोर्निया विद्यापीठ यांनी त्याची निवड केली आहे. त्याने कुठल्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा हे ठरवलेले नाही. सीबीसी सॅक्रॉमेंटो दूरचित्रवाणी वाहिनीला त्याने सांगितले, की वयाच्या अठराव्या वर्षी मी डॉक्टर झालेलो असेन. मी काही कुणापेक्षा वेगळा नाही. इतर मुलांसारखेच मी व्हिडिओ गेम खेळतो, केवळ सूक्ष्मदर्शकात डोळे खुपसून बसत नाही. फक्त शिकण्याची आवड आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील तो सर्वात लहान विद्यार्थी असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 3:13 am

Web Title: twelve year nold indian american boy eyes to become doctor at 18
टॅग : Doctor
Next Stories
1 ‘जुगाड संस्कृतीचा अंत?’ अग्रलेखावर व्यक्त व्हा
2 ‘व्हीजेटीआय’मधील अध्यापक उपोषणाच्या तयारीत
3 आता विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे मूल्यमापन!
Just Now!
X