26 February 2021

News Flash

दरड कोसळून नेपाळमध्ये २५ जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे दरड कोसळून नेपाळमध्ये १३ महिलांसह २५ जणांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता झाले आहेत.

| July 31, 2015 01:40 am

मुसळधार पावसामुळे दरड कोसळून नेपाळमध्ये १३ महिलांसह २५ जणांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता झाले आहेत. तर काही घरे दरडीखाली गाडली गेली आहेत.
काठमांडूपासून पश्चिमेकडे २५० कि.मी. अंतरावर असलेल्या कासकी जिल्ह्य़ातील पोखारा या पर्यटनस्थळी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून दरड कोसळल्यामुळे आणखी हानी झाल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. याठिकाणी ११ महिला आणि आठ पुरुषांना प्राण गमवावे लागले. तर लुमले येथे दरड कोसळल्यामुळे १४ जण बेपत्ता झाले आहेत. त्याचप्रमाणे भदोरे येथे दरड कोसळल्यामुळे दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळल्यामुळे पोखरा-बॅगलंग महामार्गाचेही नुकसान झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. नेपाळ लष्कर आणि नेपाळ पोलीस यांच्याकडून मदतकार्य सुरू आहे. काठमांडूपासून ३५० कि.मी अंतरावर असलेल्या मुना आणि मुदुनी गावांमध्ये दरड कोसळल्याने एका लहान मुलाचा मृत्यू झाला असून पाच जण बेपत्ता झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दर वर्षी पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये नेपाळमधील अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:40 am

Web Title: twenty five dead in nepal landslides
टॅग : Landslides,Nepal
Next Stories
1 शाहरूख खानला भेटायला आलेल्या ‘त्या’ पाकिस्तानी महिलेला परत पाठविले…
2 शोकाकुल वातावरणात अब्दुल कलाम यांना अखेरचा निरोप
3 अशी झाली शेवटची सुनावणी…
Just Now!
X