गाय, गोमांस, गोहत्या, कत्तलखाने असे मुद्दे सध्या देशभरात चर्चेत आहेत. गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्यात यावे, अशी सूचना बुधवारी राजस्थान उच्च न्यायालयाने केली आहे. देशभरात गाय आणि गोवंश हत्या यांची चर्चा सुरु असताना आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून संजय सिंह यांनी बकरीला राष्ट्रीय बहिण घोषित करण्यात यावी, असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय सिंह यांनी बकरीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘गांधीजींनी बकरीचे दूध आरोग्यदायी असल्याचे म्हटले होते. त्यामुळेच बकरीला राष्ट्रीय बहिण घोषित करा,’ असे ट्विट संजय सिंह यांनी गुरुवारी केले. या ट्विटमुळे संजय सिंह ट्विटर वापरकर्त्यांच्या रडारवर आले. ‘असे ट्विट करताना तुम्हाला शरम वाटत नाही का ?,’ असा सवाल एका ट्विटर वापरकर्त्याने संजय सिंह यांना विचारला. बुधवारी राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेशचंद्र शर्मा यांनी गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याची मागणी केली होती. आता या वादात आम आदमी पक्षानेदेखील उडी घेतली आहे.

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी बकरीचे दूध शरीरासाठी अतिशय उत्तम आणि ज्ञानवर्धक असल्याचे म्हटले होते. त्यामुळे बकरीला राष्ट्रीय बहिण घोषित करा,’ असे ट्विट संजय सिंह यांनी केले. संजय सिंह यांच्या ट्विटवर अनेकांनी निशाणा साधला. ‘दिल्ली सरकार राज्य स्तरावर असे करत असल्यास आम्ही याचे स्वागत करु,’ असे एका वापरकर्त्याने म्हटले. तर एका व्यक्तीने ‘हे ट्विट तुमच्या आईला वाचून दाखवा. मग पाहा तुमची आई काय म्हणते,’ असे प्रत्युत्तर संजय सिंह यांना दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter aap leader sanjay singh national sister goat national animal cow
First published on: 01-06-2017 at 16:37 IST