बडय़ा व्यक्तींचे ट्विटर खाते हॅक केल्याच्या जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या घटनेत फ्लोरिडातील किशोरवयीन मुलास अटक करण्यात आली आहे. त्याने या व्यक्तींची खाती हॅक करून १ लाख डॉलरचा घोटाळा केला होता. हा मुलगा या हॅकिंग प्रकरणात सूत्रधार होता. ग्रॅहॅम इव्हान क्लार्क (वय १७) असे त्याचे नाव असून त्याला टंपा येथे अटक करण्यात आली. हिल्सबर येथील अ‍ॅटर्नी कार्यालय त्याच्यावर प्रौढ असल्याचे गृहीत धरून खटला भरणार आहे. त्याच्यावर तीस आरोप असून या हॅकिंग घोटाळ्यात आर्थिकलाभ मिळालेले मॅसन शेपर्ड (१९), बोगनोर रेगनीस (ब्रिटन), निमा फाजेली (वय २२, ऑरलँडो) यांचाही आरोपींत समावेश आहे. त्यांच्यावर कॅलिफोर्निया संघराज्य न्यायालयात आरोप ठेवले जातील.  त्यांनी बराक ओबामा, जो बायडेन आदींची  खाती हॅक केली होती.