भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक लेहला भेट दिली आहे. निमू येथील फॉरवर्ड पोस्टवर तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांबरोबरच मोदींनी, हवाईदल आणि आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्सच्या जवानांशीही मोदींनी संवाद साधला. कोणतीही पूर्वसूचना न देता नरेंद्र मोदी लेह येथे पोहोचले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी ही अचानक भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी सैनिकांचे मनोबल वाढवण्याबरोबरच भारत-चीन सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. मोदींच्या या भेटीसंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर मोदींच्या या सप्राइज व्हिजीटचं चांगलचं कौतुक होताना दिसत आहे. अनेक नेत्यांनी मोदींच्या या भेटीला मास्टर स्ट्रोक असल्याचं म्हटलं आहे. पाहुयात कोणी काय ट्विट केलं आहे.

भाजपा अधिकृत ट्विटर हॅण्डल

पियूष गोयल, रेल्वे मंत्री

किरेन रिजज्जू, केंद्रीय मंत्री

तेजस्वी सूर्या, भाजपा खासदार

तारेख फतेह, लेखक

रमेश बाला, चित्रपट समिक्षक

बी. एल. संतोष, भाजपा नेता

अशोक पंडीत, दिग्दर्शक

प्रमोद सावंत, गोव्याचे मुख्यमंत्री

भारत चीन सीमेवर पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये १५ जून रोजी झालेल्या हिसेंमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरामधून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर देशातील राजकारणही चांगलेच तापले आहे. विरोधीपक्षांनी सरकारकडून लडाखमधील संघर्षासंदर्भात माहिती लपवली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर सरकारने हे आरोप फेटाळून लावत भारताची एक इंच जमीनही कोणाला देण्यात आलेली नाही असं सांगत आहे. मागील दोन आठवड्यांपासून या प्रश्नावरुन देशातील प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेसमध्ये आणि भाजपामध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर मोदींची ही भेट म्हणजे विरोधकांबरोबरच चीनला इशारा देण्यासंदर्भात महत्वाची असल्याचे सांगितले जात आहे.