24 September 2020

News Flash

‘मायव्होट टुडे’शी संबंधित २८ ट्विटर हँडल बंद

२७ हँडलवरही आक्षेपार्ह बाबी दिसून आल्या त्यामुळे ती सर्व हँडल्स बंद करण्यात आली आहेत.

| July 11, 2018 01:54 am

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : समाजमाध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या बनावट  बातम्या व अफवांमुळे होणाऱ्या हिंसाचारामुळे आता ट्विटरनेही बोट, ट्रोल्स व बनावट खात्यावर कारवाई केली आहे. त्याशिवाय मायव्होट टुडे हे जनमत चाचणीच्या उपयोजनाचा वापर करणारी एकूण २८ ट्विटर हँडल बंद करण्यात आली आहेत. या अ‍ॅपच्या मदतीने कुठल्याही प्रश्नावर लोकांची मते घेतली जात होती. तुमच्या मते खालीलपैकी कुणाला गप्प करणे आवश्यक आहे, असा एक प्रश्न यात देण्यात आला होता त्यात मुख्यमंत्री, विरोधी राजकारणी, पत्रकार असे काही पर्यायही दिले होते.

ट्विटरच्या प्रवक्तयाने सांगितले की, धमकावणे व कुणाचा छळ करणे, कुणाला गप्प करणे, कुणाला भीती दाखवून गप्प बसवणे असे प्रकार यापुढे चालणार नाहीत. त्यामुळे एक विशिष्ट खाते आम्ही बंद केले आहे. मायव्होट टुडे हँडलवर आम्ही शोध घेतला असता त्यात बरेच आक्षेपार्ह आढळून आले.

मायव्होट टुडेच्या इतर २७ हँडलवरही आक्षेपार्ह बाबी दिसून आल्या त्यामुळे ती सर्व हँडल्स बंद करण्यात आली आहेत. मायव्होट टुडेवर आधारित एका खात्याने अनेक नियमांचे उल्लंघन केले होते. मायव्होट टुडे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे जनमत चाचणी उपयोजन आहे त्यात ऑनलाईन मतदान घेतले जाते. ते अ‍ॅपशन डिजिटल टेक्नॉलॉजीज प्रा. लि. बंगळुरू व अ‍ॅपशन डिजिटल इनकार्पोरेशन – पालो अस्टो, कॅलिफोर्निया संस्थांनी  तयार केले आहे.

अलीकडे माय व्होट टुडेवर ‘टू मेक इंडिया ग्रेट अगेन वीच ऑफ द ६६ अ‍ॅलेज्ड एनेमीज ऑफ इंडिया हॅव टूबी सायलेन्स्ड’ असा प्रश्न विचारला होता. त्यात तोंडे बंद करण्यासाठीच्या व्यक्तींचे ६६ पर्याय दिले होते, हे ६६ जण सरकारच्या धोरणांवर टीका करणारे होते. त्या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पी. चिदंबरम, सलमना खुर्शीद, माकपचे सीताराम येचुरी, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला व ओमर अब्दुल्ला, याशिवाय काही पत्रकार, प्राध्यापक, कलाकार, विद्यार्थी, फुटीरतावादी यांचा समावेश होता.

दुसऱ्या एका ऑनलाइन जनमत चाचणीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बॉलिवूड अभिनेते आमीर खान व शाहरूख खान यांच्यापैकी कुणाच्या थोबाडीत मारावी असे तुम्हाला वाटते, हा एक प्रश्न होता.

ट्विटर प्रवक्याने सांगितले की, खासगी खात्यांवर आम्ही टिप्पणी करणार नाही पण कुणी धमकावत, घाबरवत असेल तर ती खाती बंद केली जातील. अ‍ॅपशन डिजिटलचे अमित बागरिया यांनी सांगितले की, ट्विटरची ही चाल आम्हाला बदनाम करण्यासाठी आहे, कारवाई केलेली खाती चुकीच्या पद्धतीने बंद केली आहेत. फेसबुकप्रमाणेच ट्विटरने आता बनावट खाती बंद करण्यास सुरुवात केली आहे. कुणाचे स्पॅमिंग करण्यासाठी ट्विटर खाते वापरता येणार नाही असे ट्विटरच्या प्रवक्याने सांगितले.

ट्विटरकडून लाखो खाती बंद

स्थानिक व जागतिक संदर्भ विचारात घेऊन आमचे पथक कारवाई करील. मे २०१८ अखेर ट्विटरला ९९ लाख खाती दर आठवडय़ाला आक्षेपार्ह दिसून आली. त्यावर कारवाई नंतर स्पॅम रिपोर्ट मार्चमध्ये दिवसाला २५,००० होते ते मे महिन्यात १७ हजापर्यंत खाली आले. ट्विटरने खोटय़ा व संशयास्पद खात्यांवर कारवाई करताना गेल्या काही महिन्यात दिवसाला दहा लाख खाती बंद केली आहेत. मे व जून महिन्यात ७ कोटी खाती बंद करण्यात आली, असे दी वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 1:54 am

Web Title: twitter blocked 28 accounts to crack down abusive behavior
Next Stories
1 भारत महिलांसाठी असुरक्षित देश असल्याचा अहवाल अमान्य- रविशंकर प्रसाद
2 पहिल्या शीख पोलीस अधिकाऱ्याला पाकिस्तानात अपमानास्पद वागणूक
3 काश्मीरवरील संयुक्त राष्ट्राच्या वादग्रस्त अहवालामागे पाकिस्तानी व्यक्तीचा हात
Just Now!
X