आजच्या पिढीसाठी व्यक्त होण्याचे लोकप्रिय माध्यम असणाऱ्या Twitter या सोशल नेटवर्किंग साईटचा आज दहावा वाढदिवस आहे. युझर्सना त्यांच्या भावना मांडण्यासाठी १४० कॅरॅक्टर्सचा अवकाश प्राप्त करून देणाऱ्या ट्विटरचा सध्याच्या जमान्यात चांगलाच बोलबाला आहे. २१ मार्च २००६ साली ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीने ‘जस्ट सिटिंग अप माय ट्विटर’ असे पहिले ट्विट केले होते.
3256DAD900000578-3499141-image-a-184_1458320990581
‘ ट्विटर’च्या दशकपूर्तीनिमित्त आज सकाळापासून लाखो युझर्स शुभेच्छा देत असून ट्विटरनेही एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचे आभार मानले आहेत. #LoveTwitter हा हॅशटॅगही आज ट्रेंडिगमध्य अव्वल स्थानावर आहे. बिझ स्टोन, ईव्हान विलियम्स आणि जॅक डॉर्सी या तिघांनी मिळून अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात ही कंपनी सुरू केली होती. आजच्या घडीला ट्विटरवर दिवसभरात ५० कोटीहून अधिक ट्विट केले जातात तर वर्षभरात सुमारे २० अब्ज ट्विट्स केली जातात. त्यामुळे आज जगातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सरकारे, संस्थांसाठी ट्विटर हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनले आहे.