ट्विटर डाउन झालं आहे. अनेक युजर्सना काही वेळापासून नॉट वर्किंगचा मेसेज येतो आहे. यामागचं कारण काय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र अनेक युजर्सना ट्विटर ऑपरेट करताना प्रॉब्लेम येतो आहे. ट्विटरकडून अद्याप याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य किंवा पत्रक पोस्ट करण्यात आलेलं नाही. द सनने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

अमेरिकेतल्या काही भागांमध्येही ट्विटर लोड न होण्याची समस्या युजर्सना जाणवत होती. तसंच काही वेळापूर्वी भारतातही अनेक युजर्सना ही समस्या जाणवत होती. मात्र काही वेळाने ट्विटर पूर्ववत झालं आहे.