News Flash

काही वेळासाठी टिवटिव बंद! ट्विटर पूर्ववत झालं सुरू

अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी

(संग्रहित छायाचित्र)

मायक्रोब्लॉगिंग साईट अशी ओळख असणारं ट्विटर डाऊन झालं आहे. भारतासह मलेशिया, इंडोनेशिया या देशांमधील युजर्सनी ट्विटर डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या करण्यात आल्या. ट्विटर डाऊन झाल्याने अनेक युजर्सना याचा फटका बसला असून, ट्विटर अकाऊंटवरील अपडेट दिसत नसल्याच्या तक्रारी केल्या. मात्र, डाउन झालेलं ट्विटर अर्धा ते पाऊण तासानंतर पूर्ववत सुरू झालं. महिनाभरात तिसऱ्यांदा ट्विटर डाउन झालं.

बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ट्विटरवर अपडेट होण्यास अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. भारताबरोबरच मलेशिया, इंडोनेशिया या देशांमधील युजर्सनी ही समस्या जाणवली. रिफ्रेश करूनही ट्विटरवरील माहिती अपडेट होत नसल्याच्या तक्रारी येण्यास सुरू झाल्या. कम्प्युटरबरोबरच अॅड्राईड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या मोबाईलमध्येही ट्विटर अपडेट होत नसल्याच्या तक्रारी केल्या गेल्या. मात्र, डाउन झालेलं ट्विटर अर्धा ते पाऊण तासानंतर पूर्ववत सुरू झालं.

यापूर्वी दोन वेळा झालं होतं डाउन

ट्विटर डाउन होण्याची ही महिनाभरातील तिसरी वेळ आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी ट्विटर डाउन झालं होतं. अनेक युजर्सना काही वेळापासून नॉट वर्किंगचा मेसेज प्राप्त झाला होता. अमेरिकेतल्या काही भागांमध्येही ट्विटर लोड न होण्याची समस्या युजर्सना जाणवली होती. तसंच भारतातही अनेक युजर्सना ही समस्या जाणवली. त्यानंतर १६ ऑक्टोबरला ट्विटर डाउन झाल्याचा प्रकार घडला. त्यावर ट्विटरकडून अधिकृत भूमिकाही स्पष्ट करण्यात आली होती. प्रणालीमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्यानं हे घडल्याचं ट्विटरनं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 8:48 pm

Web Title: twitter down in india as users unable to refresh feed on pc android ios bmh 90
Next Stories
1 बिहारचा रहिवासी बनला ‘या’ देशाचा राष्ट्रपती
2 खासगी शाळांना फीमध्ये २० टक्के कपातीचा आदेश, सुप्रीम कोर्टाचा स्थगितीस नकार
3 बिहारमध्ये प्रचार करत असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X