News Flash

हाफिजची टिव टिव बंद

ट्विटरने केले हाफिजचे 'हाफिज सईद लाईव्ह' अकाउंट ब्लॉक

दहशतवादी हाफिज सईद. (संग्रहित छायाचित्र)

ट्विटर या माक्रोब्लॉगिंग साईट्ने जमात उद दवाचा म्होरक्या हाफिज सईद याचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केले आहे. भारतीय गुप्तचर विभागाने कंपनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर ट्विटरने कठोर पाऊल उचलत हाफिजचे अकाउंट ब्लॉक केले.
गेल्या काही दिवसांपासून हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणी याची छायाचित्रे हाफिज आपल्या अकाउंटवरून पोस्ट करत आहे. तसेच सईदने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून वाणीला श्रद्धांजली वाहतानाचे फोटो देखील अपलोड केलेत.
यावरून ‘हाफिज सईद लाईव्ह’ हे अकाउंट सतत अपडेट होत असल्याचेही समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी लाहोरमध्ये घेतलेल्या एका सभेत काश्मीरमधल्या दंगेखोरांना पाकिस्तानी जनतेने मदत करावी, असे केल्याने काश्मीर पाकिस्तानचा होईल, अशा स्वरूपाचे प्रक्षोभक भाषण देखील सईदने केले होते. हाफिज हा २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड देखील आहे.
सोशलमीडियाचा वापर करून दहशतवादाचा प्रचार केला जातोय, इसिससारख्या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियासारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून  दहशतवादाचे जाळे जगभर पसरवले.
हाफिज देखील ट्विटरवर सक्रिय असल्याचे समजताच भारतीय गुप्तचर यंत्रणेने त्याचे अकाऊंट सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॉक करण्यात यावे अशी सूचना कंपनीला केली , त्यानंतर लगेचच ट्विटरने त्याचे अकाउंट ब्लॉक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 5:29 pm

Web Title: twitter has blocked jud chief hafiz saeeds account
Next Stories
1 उत्तर प्रदेशात शीला दीक्षित काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार
2 ‘नीट’वरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारले
3 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून मोदी धडा घेतील- सोनिया गांधी
Just Now!
X