सोशल नेटवर्किंग साइटवरील नेटकऱ्यांच्या जास्त वापरात असेलले ट्विटर आज सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा डाउन झाले आहे. भारतासह २१ देशातील कोट्यावधी युजर्सकडून संताप व्यक्त केला जात आहे.

भारत, अमेरिका, जपान, कॅनडा, ब्राझील, यूकेसह जगभरातील २१ देशात ट्विटर डाउन झाले आहे.  ट्विटर युजर कोणतेही ट्विट करण्याचा प्रयत्न करीत असल्यास त्याला   Try आणि  ‘Something Went Wrong’ हे दोन मेसेज येत आहेत. यामुळे  ट्विटरवर अॅक्टिव असलेल्या युजर्सना ट्विट करता येणे शक्य होत नसल्याचे दिसत आहे. तसेच केले गेलेले ट्विट रिट्विट करता येत नाहीत.

ट्विटर नेमक्या कोणत्या कारणामुळे डाउन झाले याविषयीची ट्विटरकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. याआधीही ट्विटरवर यासारखी समस्या उद्धभवली आहे. त्यामुळे ट्विटरवर सक्रीय असलेल्या युजर्सच्या संताप होत आहे.