असं म्हणतात, एखादी गोष्ट दान करताना तिचं मोल पाहायचं नसतं. एखाद्या व्यक्तीनं दान दिलं की त्यानं काय दान दिलं आणि किती दान दिलं हेही पाहायचं नसतं. यावेळी फक्त विचार करायचा असतो तो त्या व्यक्तीच्या मोठेपणाचा. मात्र भारतातल्या अब्जाधीशांपैकी एक गणल्या जाणाऱ्या पेटीएमच्या मालकानं जेव्हा पुरग्रस्तांसाठी फक्त १० हजारांची मदत केली तेव्हा मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर सडकून टीका होऊ लागली.

Kerala Floods: मनाची श्रीमंती! ‘ती’ तरुणी मदत म्हणून मिळालेला पैसा देणार पूरग्रस्तांना

देशभरातून लोक जमेल तशी मदत केरळमधल्या पुरग्रस्तांसाठी करत आहेत. काही कलाकारांनी स्वत: रस्त्यावर उतरून पुरग्रस्तांना मदत केली, काहींनी आपल्या घराचे दार खुले केले. तर इतर कलाकारांनीही लाखोंची मदत पुरग्रस्तांना केली. मात्र पेटीएमचे विशेष कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी केवळ १० हजारांची मदत केली म्हणून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका होत आहे. ज्याच्या घरात लक्ष्मी नांदते त्यानं तरी मदत करताना हात आखडता घेता कामा नये अशा शब्दांत त्यांची चांगलीच खरडपट्टी नेटकऱ्यांनी काढली.

Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आयएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

शेखर यांनी ट्विट करत आपण केरळच्या पुरग्रस्तांना १० हजारांची मदत केली असं जाहीर केलं. तसेच पेटीएमद्वारे पैसे पाठवून लोकांना मदत करण्याचं आवाहन देखील केलं. पेटीएमनं आवाहन केल्यानंतर केवळ ४८ तासांच्या आत लोकांनी भरभरून मदत केली. अल्पावधित या अॅपद्वारे केरळमधल्या लोकांसाठी १० कोटींचा मदत निधी उभा करण्यात आला. मात्र याचवेळी शेखर यांनी दाखवलेली कंजूसी अनेकांना रुचली नाही. टीका झाल्यानंतर लगेचच शेखर यांनी आपलं ट्विट डिलीट केलं. मात्र याचे स्क्रीन शॉट आता व्हायरल होत आहेत.