22 September 2020

News Flash

आक्षेपार्ह मजकूर हटवण्यास ट्विटर अपयशी, सरकारचा इशारा

दिशा-निर्देशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सरकारने ट्विटरला दिला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

देशात हिंसा भडकवणे, महिलांविरोधातील संदेश किंवा अफवा पसरवण्यास मदत मिळेल अशी आक्षेपार्ह आणि अवैध मजकूर हटवण्याच्या दिशेने धीम्यागतीने काम सुरु असल्याच्या कारणावरुन सरकारने ट्विटरला फटकारले आहे. दिशा-निर्देशांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही सरकारने ट्विटरला दिला आहे.

केंद्रीय गृह सचिव राजीव गोबा यांनी ट्विटर इंडियाचे कायदा आणि सुरक्षा प्रमुख विजय गाडे आणि महिमा कौल यांना सरकारी संस्थांच्या आदेशांचे त्वरीत निराकरण करण्यासाठी २४ तास काम करणारी यंत्रणा निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, आक्षेपार्ह मजकुरांविरोधात प्रभावी कारवाईसाठी आयोजित बैठकीत मायक्राेब्लॉगिंग साइटच्या अधिकाऱ्याने काही प्रकरणात ट्विटर आक्षेपार्ह माहिती हटवणे किंवा ब्लॉक करण्याचे काम मंदगतीने करत असल्याचे सांगितले.

बनावट बातम्यांवर अंकुश लावण्यासाठी आपण प्रतिबद्ध असल्याचे, भारताच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेले ट्विटरचे सीईओ जॅक डोरेसी यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 9:46 am

Web Title: twitter violence hate messages rumors unlawful objectionable content indian government
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 ‘राहुल गांधींच्या पूर्वजांनाही संघाच्या शाखा बंद करणं जमलं नाही’
3 पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी घट; पहा…आजचे दर
Just Now!
X