News Flash

बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांना अटक

बोधगया येथील महाबोधी मंदिर परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) दोन संशयितांना आज रविवार अटक केली आहे.

| August 18, 2013 03:42 am

बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांना अटक

बोधगया येथील महाबोधी मंदिर परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए) दोन संशयितांना आज रविवार अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबोधी मंदिरात ७ जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी बिहारमधील दरभंगा येथून दोन संशयितांना चौकशीसाठी अटक केली आहे. एनआयएने या प्रकरणी बुधवारी मंदिराचे पुजारी असलेल्या अरुप ब्रह्मचारी याला अटक केली आहे. बॉम्बस्फोटानंतर अरूप बोधगया सोडून पश्चिम बंगालला गेला होता. त्यामुळे त्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2013 3:42 am

Web Title: two arrested for bodhgaya bomb blast
Next Stories
1 साधू यादव भाजपमध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – सुशील मोदी
2 मोदींवर टीका केल्याने भाजप संतप्त
3 निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणे ही काँग्रेसची परंपरा नाही
Just Now!
X