वेश्याव्यवसायासाठी मानवी तस्करी करण्याच्या आरोपावरून एक इसम आणि एका महिलेला शनिवारी अटक करण्यात आली असून, त्यांच्या तावडीतून तीन मुलींची सुटका करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोवा राज्य जलस्रोत विभागात पंपचालकाचे काम करणारा प्रवीण परब (२७) आणि मुंबईतील साजिया खान (२७) यांना मानवी तस्करीप्रकरणी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मानवी तस्करी केली जात असल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी एक ग्राहक परब याच्याकडे पाठविला. तेव्हा परब ठरलेल्या ठिकाणी काही मुलींना घेऊन आला असता त्याला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. कर्नाटकमधील दोन आणि मुंबईतील एका मुलीची सुटका करण्यात आली असून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.