News Flash

येरवड्यातील महापालिका शाळेच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू

खेळताना ते पाण्याच्या टाकीजवळ गेले आणि चुकून टाकीत पडले त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातील येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात महानगरपालिकेच्या शाळेच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, येरवडयातील लक्ष्मीनगर भागातल्या महापालिका शाळेच्या परिसरात ही दुर्घटना घडली आहे. दुपाराच्या सुमारास रुद्र चव्हाण आणि रुद्र भुजबळ हे दोघे खेळण्यासाठी शाळेच्या परिसरात गेले होते. खेळताना ते पाण्याच्या टाकीजवळ गेले आणि चुकून टाकीत पडले. टाकी पाण्याने भरलेली असल्याने आणि या मुलांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शाळेच्या परिसरात कमी उंचीवर असणाऱ्या या पाण्याच्या टाकीभोवती योग्य सुरक्षा व्यवस्था न केल्यानेच या दोन मुलांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र, पोलिसांच्या तपासानंतरच यामागील खरे कारण कळू शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2018 10:54 pm

Web Title: two children die after falling in a water tank in the yerawada municipal school
Next Stories
1 भारत-पाकदरम्यान पहिल्यांदाच होणार युद्ध सराव; चीनसह अनेक देश होणार सहभागी
2 बिहारमध्ये नदीत होडी बुडाल्याने ८ जणांचा मृत्यू; बचाव कार्य अद्याप सुरु
3 पोलीस भरतीदरम्यान उमेदवारांच्या छातीवर SC/ST लिहिल्याने वाद
Just Now!
X