अंमलबजावणी संचालनालय(ईडी)ने दोन चिनी नागरिकांना मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. चार्ली पेंग आणि कार्टर ली अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांनाही १४ दिवसांसाठी ईडीच्या ताब्यात देण्यात आलं आहे. हे दोघेहीजण दिल्लीत राहून चिनी कंपन्यांसाठी फार मोठे हवाला रॅकेट चालवत होते व भारत सरकारला कोट्यावधींच्या महसुलाचं नुकसान पोहचवत होते.
मागील वर्षी चार्ली पेंगच्या ठिकाणांवर प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने देखील अशातच चार्ली पेंग विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
ईडीने चार्ली विरोधात ऑगस्टमध्येच मनी लॉण्ड्रिंगचा खटला दाखल केला होता. एवढ्या प्रदीर्घ काळापासून ईडी चार्ली पेंगच्या सर्व संशयी व्यव्हारांवर नजर ठेवून होती. तपासात हे देखील समजले आहे की चार्ली पेंगचा समावेश केवळ भारतातील हवाला कारभारात सहभाग नव्हता तर, तो तिबेटी धर्मगुरू दलाई लामांची देखील हेरगिरी करत होता.
Two Chinese nationals held in money laundering case sent to 14-day ED remand
Read @ANI Story | https://t.co/1nbbZewKb5 pic.twitter.com/P7oMoONFtc
— ANI Digital (@ani_digital) January 17, 2021
चार्ली पेंग खोट्या कंपन्या तयार करून हवाला नेटवर्क चालवत होता. दिल्ली एनसीआरच्या सायबर सिटी गुरुग्रामच्या सेक्टर ५९ गोल्फ कोर्स रोड येथील पर्म स्प्रिंग प्लाझा येथील पत्त्यावर चार्लीने इनविन लॉजिस्टिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी रजिस्टर्ड केली होती. मात्र, प्लाझाच्या व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार तिथं कोणतीच चिनी कंपनी नव्हती.
तपास यंत्रणांनी चार्लीची दिल्ली आणि गुरुग्रामच्या त्या सर्व पत्त्यांबाबत चौकशी केली आहे, ज्याच्या आधारे त्याने आपले आधारकार्ड बनवले होते व भारतात आपल्या बनावट कंपन्या रजिस्टर्ड केल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या मते चार्ली पेंगने हवाला मार्फत जे पैसे मागवले ते तिबेटिंना दिले व त्या पैशांचा उपयोग हेरगिरीसाठी केल्या गेल्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 17, 2021 2:05 pm