News Flash

जम्मू काश्मीर – दगडफेकीमुळे ताबा सुटलेल्या ट्रकने दोन CRPF जवानांना चिरडलं

रियाज अमहद वनी आणि निस्सार अहमद वनी यांचा जागीच मृत्यू

दक्षिण काश्मीरमधील कोकेरंग येथे सीआरपीएफच्या ट्रकने आपल्याच दोन जवानांना चिरडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. दगडफेकीमुळे हा अपघात झाला. दगडफेकीमुळे ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि दोन जवान चिरडले गेले. जखमी झालेल्या दोन्ही जवानांचा मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.

श्रीनगरपासून ८५ किमी लांब असणा-या कोकेरंग येथून सीआरपीएफ जवान निघत असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. कायदा सुव्यवस्था राखली जावी यासाठी त्यांना तिथे तैनात करण्यात आलं होतं. मात्र तेथून निघत असताना अचानक त्यांच्यावर दगडफेक सुरु झाली.

‘सीआरपीएफच्या ट्रकवर झालेल्या दगडफेकीमुळे चालकाचा ताबा सुटला आणि अपघात झाला. दोन्ही सीआरपीएफ जवानांचा जागीच मृत्यू झाला. काहीजण जखमी झाले असून अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत’, अशी माहिती अनंतनाग पोलिसांनी दिली आहे.

रुप सिंग हे ट्रक चालवत होते. दगड डोक्यावर लागल्याने त्यांची शुद्ध हरपली आणि समोर जात असलेल्या मोटरसायकलवर ट्रक गेला. यावेळी रियाज अमहद वनी आणि निस्सार अहमद वनी हे दोघे जवान मोटरसायकलवर होते. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण त्यांना पोहोचता क्षणी मृत घोषित करण्यात आलं. या अपघातात काहीजण जखमीही झाले आहेत. परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 10:12 pm

Web Title: two crpf jawan died after truck overturned
Next Stories
1 उगाच बाहेरच्यांनी येऊन आम्हाला शिकवू नये, आफ्रिदीच्या वक्तव्यावर सचिनचा संताप
2 खाकी वर्दीतलं प्रेम ! पोलीस अधिका-याचं महिला कॉन्स्टेबलसोबत जुळलं सूत
3 भारत बंददरम्यान झालेल्या मृत्यूंसाठी विरोधक जबाबदार – अमित शाह
Just Now!
X