News Flash

बँक कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप, सोमवारीच करुन घ्या कामं

सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी संप पुकारलाय

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मंगळवार (दि. ८) आणि बुधवार (दि. ९) जानेवारी रोजी देशातील बँकांच्या व्यवहारास फटका बसणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी संघाने आगामी ८ ते ९ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या कामगार विरोधी योजनांविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी हा संप पुकारलाय.

देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी पुन्हा बँक बंदची हाक दिली आहे. मंगळवारी आणि बुधवारी संपाची हाक दिल्यामुळे तुमची बँकेतील महत्त्वाची कामं सोमवारीच करुन घ्या, कारण संपामुळे काही प्रमाणात कामकाज ठप्प होऊ शकते. अलाहाबाद बँकेने सेबीला पत्र पाठवून या दोन दिवशी बँक व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर, बँक ऑफ बडोदानेही असाच अंदाज व्यक्त केला आहे.

यापूर्वी २६ डिसेंबर रोजीही जवळपास १० लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 4:48 pm

Web Title: two day strike called by bank unions
Next Stories
1 ममता बॅनर्जी देशाच्या पहिल्या बंगाली पंतप्रधान होतील, भाजपा प्रदेशाध्यक्ष
2 लाच प्रकरणात योगींचे 3 मंत्री अडचणीत, तीन स्वीय सहायकांना अटक
3 ३ मलेशियन महिलांसह आतापर्यंत १० महिलांनी घेतले शबरीमलाचे दर्शन
Just Now!
X