नेपाळमध्ये ११ जणांना घेऊन जाणारे एक छोटेखानी विमान देशाच्या पश्चिमेकडील दुर्गम भागात कोसळून त्याचे दोन्ही वैमानिक ठार झाले. तीन दिवसांत झालेला देशातील हा दुसरा विमान अपघात आहे.

नेपाळगंजहून दुपारी १२.१६ वाजता उडलेले एअर काष्ठमंडपचे हे विमान जुमला येथे जात असताना कालिकोट जिल्ह्तीन दिवसांत झालेला देशातील हा दुसरा विमान अपघात आहे.य़ातील चिल्खया येथे कोसळले. या विमानात ११ लोक होते. कॅप्टन दिनेश नेउपने व सहवैमानिक संतोष राणा हे दोघे अपघातात मरण पावले, तर एक प्रवासी जखमी झाला. नेपाळी नागरिक असलेले नऊ प्रवासी सुरक्षित असून त्यांना अपघातानंतर लगेच बाहेर काढण्यात आले, असे नेपाळच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले.