News Flash

धक्कादायक: जॉयराईड ठरली ‘डेथ’राईड, झुला तुटून दोघांचा मृत्यू

आकाशपाळणा तुटल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे

कोणत्याही पार्कमध्ये जॉयराईड वर एँजॉय करणं एक वेगळा आनंद देणारं असतं. मात्र गुजरातच्या कांकरिया अॅडव्हेंचर पार्कमधली जॉयराईड जीवघेणी ठरली आहे. कारण रविवारी जॉयराईडचा तुटल्याने दोघांना त्यांचा प्राण गमवावा लागला आहे. तर अनेक लोक या अपघातात जखमी झाले आहेत.

अहमदाबाद येथील आकाशपाळणा तुटला

कांकरिया पार्कमधला हा झुला नेमका तुटला कसा? याची चौकशी आम्ही सुरु केली आहे असं आयुक्त विजय नेहरा यांनी म्हटलं आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचं पथक या ठिकाणी दाखल झालं. तसेच त्यांनी मदत आणि बचावकार्य करुन जे लोक जखमी झाले आहेत त्यांना तातडीने रूग्णालयात पोहचवलं. या घटनेत एकूण २६ जण जखमी झाले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 12:01 pm

Web Title: two dead over 15 hurt as joyride turns tragic in ahmedabad scj 81
Next Stories
1 न्यायालयाबाहेर थरारनाट्य, भाजपा आमदाराच्या मुलीचं अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ
2 गायींच्या मृत्यूप्रकरणी ८ अधिकारी निलंबित, योगी आदित्यनाथ सरकारचा निर्णय
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X