News Flash

‘मोमो’ चॅलेंजमुळे दोघांचा मृत्यू, पश्चिम बंगाल सरकार सतर्क

शैक्षणिक संस्थांना शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश

पश्चिम बंगालमध्ये मोमो चॅलेंज या ऑनलाइन गेममुळे दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकार सतर्क झालं आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे दिशा-निर्देश सर्व पोलीस स्थानकांना देण्यात आले असून शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेशही शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहेत.

मोमो चॅलेंजमुळे आत्महत्या करण्याच्या घटना वाढत आहेत. ब्ल्यू व्हेल चॅलेंजनंतर आता आम्ही मोमो गेमच्या आव्हानाचा सामना करत आहोत. याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असं येथील एका अधिकाऱ्याने सांगितलं. या गेमसाठी जर कोणाला निमंत्रण आलं तर तातडीने पोलीस स्थानकांना माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने यावर मात करण्यासाठी सायबर तज्ज्ञांचीही मदत मागितली आहे, तसंच या जीवघेण्या गेमवर मात करण्यासाठी कोणती पावलं उचलावी याची एक यादी बनवून सर्व जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आली आहे.

काय आहे मोमो चॅलेंज –
हा ब्ल्यू व्हेल चॅलेंजप्रमाणे एक ऑनलाईन गेम आहे. यात व्हाटसअ‍ॅप अकाऊंटच्या माध्यमातून विशिष्ट युजर्सकडून आलेले विविध चॅलेंजेस स्वीकारायचे असतात. काही ठिकाणी फेसबुक ग्रुप्समधून याचा प्रचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यातील बहुतेक चॅलेंजेस हे स्वपीडेला प्रोत्साहन देणारे असतात. यात सहभाग होणार्‍याला अतिशय भयंकर हिंसक असे व्हिडीओज, प्रतिमा अथवा अ‍ॅनिमेशन्स पाठविले जाते. यातून त्याला ब्रेनवॉश करून हिंसक कृत्यासाठी तयार केले जाते. यामुळे हा गेम खेळणारा हळूहळू आत्मनाशाच्या मार्गावर प्रचंड गतीने आगेकूच करू लागतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 9:11 am

Web Title: two died from due to online killer game momo challenge in west bengal
Next Stories
1 लोकसभा निवडणुकांआधी पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावण्याचा दबाव !
2 फ्लोरिडात रेस्तराँमध्ये अंदाधुंद गोळीबार; ४ ठार, ११ जण जखमी
3 नेहरूंचे योगदान पुसण्याचा प्रयत्न करू नका!
Just Now!
X