News Flash

धक्कादायक! टेरेसवर एकमेकांना गुदगुल्या करत होते दोघं मित्र, पण पुढच्याच क्षणी नको ते घडलं

दोघं मित्र टेरेसवर जेवताना थट्टा-मस्करी करत होते पण थोड्यावेळाने त्यांनी एकमेकांना गुदगुल्या करायला सुरूवात केली आणि...

( प्रातिनिधिक छायाचित्र )

एकमेकांना गुदगुल्या करताना तोल गेल्यामुळे छतावरुन पडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीमध्ये घडली आहे. दोघांनाही उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण त्यांचा जीव वाचू शकला नाही.

रविवारी (दि.२४)दुपारी दिल्लीच्या गीता कॉलनी परिसरात ही घटना घडली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एकाच फॅक्टरीत काम करणारे दोघं मित्र रविवारी दुपारी फॅक्टरीच्या छतावर जेवण करायला गेले. जेवताना ते थट्टा-मस्करी करत होते. पण, थोड्यावेळाने त्यांनी एकमेकांना गुदगुल्या करायला सुरूवात केली आणि तोल जाऊन ते छतावरुन खाली पडले.

आणखी वाचा- धक्कादायक! एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

शफिक आणि शकिल अशी दोघा मृतांची नावं असून दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते. पत्नी आणि अन्य कुटुंबियांसोबत शफिक दिल्लीच्या जाफराबाद परिसरात वास्तव्यास होता. तर, शकिलचं घरही त्याच्या जवळच आहे. दोघंही विकास दुआ नावाच्या बिजनेसमनच्या रेडीमेड कपड्यांचा कारखान्यात कामाला होते. दरम्यान, कारखान्याच्या छतावर फक्त पायऱ्यांसाठी दरवाजा असून छताला कोणतीही सुरक्षा भिंत नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. प्रमाणापेक्षा जास्त दंगा-मस्ती कधी-कधी जीवावर बेतू शकते हेच या घटनेमुळे अधोरेखीत झालंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 9:07 am

Web Title: two friends jokingly tickle each other die after falling off roof incident of delhi sas 89
Next Stories
1 नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही – राहुल गांधी
2 RBI खरंच बाद करणार का 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा? सरकारने दिलं स्पष्टीकरण
3 शेतकरी मोर्चात गोंधळ घालण्यासाठी ३०० पाकिस्तानी ट्विटर हॅण्डल्स; पोलिसांचा दावा
Just Now!
X