दक्षिण सुदानमध्ये सुरू असलेल्या नागरी युद्धामुळे जवळपास ५००हून अधिक भारतीय सुदानमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन संकट’ मोचन सुरू केल आहे. भारतीय वायूदलाची दोन विमाने सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी रवाना झाली आहेत. या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्त्व परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सरकारी सैन्य आणि उपराष्ट्रपतीच्या सैन्यात वाद सुरू आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे. या नागरी युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांनी भारतीय दूतावासात संपर्क साधून मदतीची विनंती केलीय. या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ‘इथे अडकलेल्या प्रत्येक भारतीयांना सुखरूप परत आणण्याचा प्रयत्न आम्ही करू’ असेही सिंह यांनी सांगितले.
ज्या भारतीयांकडे अधिकृत कागदपत्रे असतील, अशा भारतीयांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.