News Flash

नौशेरा सेक्टरमध्ये दशतवाद्यांचा गोळीबार दोन जवान शहीद

परिसरात शोधमोहीम सुरूच

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांकडून दहशवाद्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात असताना, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. चकमकीनंतर देखील परिसरात शोधमोहीम सुरूच आहे.

या परिसरात काही दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर जवानांकडून या ठिकाणी शोधमोहमी राबवल्या जात होती, दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारास जवानांकडूनही चोख प्रतित्युत्तर दिले जात आहे.

तब्बल पाच महिन्याच्या कालावधीनंतर जम्मू काश्मीरमधील सरकारी रूग्णालयांमध्ये ब्रॉडबँड सेवा तर सर्व मोबाईलवर एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून जम्मू काश्मीरमध्ये एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली. ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात लँडलाइन, इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 10:07 am

Web Title: two indian army soldiers have lost their lives during a cordon search operation in nowshera sector msr 87
Next Stories
1 “अगला स्टेशन सुप्रीम कोर्ट…”, ‘या’ मेट्रो स्थानकाला मिळणार सुप्रीम कोर्टाचं नाव
2 नववर्षाची भेट; जम्मू काश्मीरमध्ये एसएमएस, इंटरनेट सेवा सुरू
3 २०१९ मध्ये भारतात ११० वाघांचा तर ४९१ बिबट्यांचा मृत्यू – रिपोर्ट
Just Now!
X