21 September 2020

News Flash

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार

काश्मीरमधील कुलगाममध्ये रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या दहशतवादी व जवानांमधील चकमकीत दोन दहशतवादी व एक नागरिक ठार झाले,

| June 23, 2015 12:32 pm

काश्मीरमधील कुलगाममध्ये रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या दहशतवादी व जवानांमधील चकमकीत दोन दहशतवादी व एक नागरिक ठार झाले, तर दोन जवान जखमी झाले. नागरिकाचा मृत्यू झाल्याने चकमक संपल्यानंतर जमावाकडून जवानांवर दगडफेक करण्यात आली.
दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली असून जावेद अहमद कचरू व इद्रिस नेंगारू अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही दहशतवादी हिजबूल मुजाहिद्दीनचे सदस्य असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या चकमकीदरम्यान एका नागरिकाचा चुकून गोळी लागून मृत्यू झाला. मात्र तेथील रहिवाशांनी जवानांवर त्याच्यावर थंड डोक्याने गोळी झाडल्याचा आरोप करत दगडफेक करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2015 12:32 pm

Web Title: two let militants civilian killed in kulgam encounter
टॅग Militants
Next Stories
1 चकमकीनंतर माओवाद्यांचे झारखंडच्या जंगलात पलायन
2 ग्रीसवर आर्थिक संकटाची टांगती तलवार कायम
3 ‘सीआयएसएफ’च्या नऊ जवानांना कोठडी
Just Now!
X