रशियातील स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल विद्यापीठाच्या वसतीगृहात रविवारी लागलेल्या आगीत नवी मुंबईतील पूजा कल्लूर व पुण्यातील करिष्मा भोसले या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. स्मोलेन्स्क विद्यापीठाच्या सहामजली वसतीगृहाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती. आग लागली तेव्हा पूजा आणि करिष्मा दोघीही एकाच खोलीत होत्या. आगीमुळे झालेल्या धुरात त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोघींचेही मृतदेह नजिकच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, याची माहिती रशियाकडून भारतीय दूतावासाती अधिकाऱयांना देण्यात आली आहे.