News Flash

जम्मू-काश्मीर: अवंतिपोरा चकमकीत दोन दहशतवादी ठार, दोन सैनिक जखमी

अवंतिपोराभागात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

जम्मू-काश्मीरच्या अवंतिपोराभागात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, दोन सैनिक जखमी झाले आहेत. या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. सीआरपीएफ, भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. अवंतिपोराच्या सातपोखरनमध्ये ही चकमक झाली.

प्राथमिक वृत्तानुसार घटनास्थळी सध्या गोळीबार थांबला आहे. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षापथकांनी त्या भागाला घेराव घातला. दोन्ही बाजूंनी मोठया प्रमाणावर गोळीबार झाला. अतिरिक्त सुरक्षा पथकांना घटनास्थळी पाचारण करावे लागले.

पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांवर पेट्रोल बॉम्ब फेकल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही चकमक झाली. हल्ल्यामध्ये कुठलेही नुकसान झाले नाही. सोमवारी संध्याकाळी सीआरपीएफच्या बंकरच्या दिशेने हे पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. यात जिवीतहानी झालेली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 2:23 pm

Web Title: two militants killed in awantipora encounter dmp 82
Next Stories
1 पेरियार यांच्याविषयी केलेल्या विधानावरून रजनीकांत यांच्याविरोधात संताप
2 पाकिस्तानात गव्हाच्या पीठाची तीव्र टंचाई, पोळी, नान नसल्याने भूक भागेना
3 नेपाळच्या हॉटेलमध्ये आठ भारतीय पर्यटक सापडले मृतावस्थेत
Just Now!
X